Tiranga Times Maharastra
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राजकीय हालचाली वेग घेत आहेत.
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्याने राज्यभरात चर्चा रंगली असली, तरी उमेदवारी न मिळाल्याने दोन्ही पक्षांतील काही स्थानिक नेत्यांनी बंडखोरी करत थेट अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ठाकरे-मनसे युतीपुढे बंडखोरांचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जे लोक पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना पुढे पश्चात्ताप होईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. बंडखोरांचा प्रश्न कसा सोडवायचा, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे-मनसे युतीसमोर बंडखोरांचा पेच वाढला असून अमित ठाकरे यांनी मराठी महापौराचा निर्धार व्यक्त केला आहे.
